सुप्रिया सुळेंच्या संवाद यात्रेला भुजबळ गैरहजर; शिवसेना प्रवेशाबाबत मोठा खुलासा

नाशिक | मै यही हुँ, मै यही हुँ, मै यही हुँ, असं म्हणत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपण राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलं आहे. 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा आज नाशिकमध्ये होती. त्याला छगन भुजबळ गैरहजर राहिल्याने त्यांच्या मनात नेमकं काय आहे?, अशा चर्चा रंगू लागल्या भुजबळांनी मात्र या चर्चांचं खंडण केलं आहे. 

पंकज, समीर, आणि माझ्या सूना सगळेच सुप्रिया सुळेंच्या संवाद यात्रेत आहेत, तसंच मीही पक्षातच आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप, सुरू असलेल्या कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या याला कंटाळून ते शिवसेनेत परतणार असल्याचं बोललं जातंय. भुजबळ मात्र वारंवार आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अधोरेखित करत आहे.

दरम्यान, पक्षात पडझड सुरू आहे मान्य आहे. पण छगन भुजबळ यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर माझा विश्वास नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-