फिरोजशहा कोटला स्टेडियमला अरुण जेटलीचं नाव; दिल्ली क्रिकेट असोसिएशनचा निर्णय

नवी दिल्ली : दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमला अरुण जेटली यांचं नाव देणार असल्याची घोषणा दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी केली आहे. स्टेडियमला अरुण जेटली यांचं नाव असेल. मात्र मैदानाचं नाव फिरोजशहा कोटला असंच राहिल.

दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे (DCCA) अरुण जेटली अध्यक्ष होते. दिल्ली क्रिकेट असोसिएशनसाठी अरुण जेटली यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. अरुण जेटली यांच्या प्रोत्साहनामुळे भारतीय संघाला विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा या सारखे खेळाडू मिळाले आहेत.

फिरोज शहा कोटला या स्टेडीयमचं नामकरण 12 सप्टेबर रोजी होणार आहे. या स्टेडियमच्या एका स्टँडला विराट कोहलीचं नाव देण्यात येणार आहे.

दरम्यान, अरुण जेटली यांनी 12 वर्ष  दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.

महत्वाच्या बातम्या-