छगन भुजबळांची घोषणा; या मतदारसंघातून विधानसभा लढणार

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार यावर बोलण्यास छगन भूजबळांनी टाळलं आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

छगन भुजबळ यांनी गणपती उत्सवानिमित्त अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. येवला येथील शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळ गणपती मंडळालाही त्यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी घोषणा देत भुजबळांचे स्वागत केले. भुजबळांनी लवकर सेनेत प्रवेश करावा, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली.

छगन भूजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा आधीही झाल्या. त्यानंतर भुजबळांनी त्याला नकार देत मी राष्ट्रवादीत असल्याचं सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-