छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात गाडी कारखान्यातून बाहेर; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. तर काही व्हिडीओ हे मनाला सुख प्राप्त करून देतात.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

ऑटोमोबाईल सेक्टरमधील प्रसिद्ध कंपनी टाटा मोटर्समधील हा व्हिडीओ असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कामगार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही कामगार गाडीला निरोप देताना दिसतात. टाटा सफारी या गाडीचं 10 हजारावं मॉडेल तयार करुन कारखान्याबाहेर काढण्यात आल्याची ही माहिती मिळाली आहे.

ही गाडी ज्यावेळी कारखान्यातून बाहेर काढण्यात आली त्यावेळी दोन्ही बाजूला उपस्थित असलेल्या कामगारांनी घोषणा दिल्या आणि टाळ्या वाजवत गाडीला निरोप देखील दिला.

गाडीच्या निरोपासाठी त्याठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढल्याचं देखील दिसतंय. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडीओ टाटा मोटर्सच्या पुण्यातील चाकणमधील शोरूमचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

दरम्यान, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असून अनेकांनी या व्हिडीओला पसंती देखील दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधींनी उलटच केलं! पक्षातील ‘ही’ परंपरा मोडण्यासाठी घेतला मोठा निर्णय

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख 

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर