‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई | राज्यातील वातावरण सध्या चांगलंच पेटल्याचं पहायला मिळत आहे. अलिबागमधील 19 बंगल्यांवरुन किरीट सोमय्या आणि ठाकरे सरकारमधे वादंग निर्माण झाला आहे.

रायगडच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आता पडताळणीसाठी सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत. यावरुन सध्या राजकीय खलबतं सुरु आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करण्याचं आवाहन दिल्यानंतर किरीट सोमय्या आज कोर्लई गावाला भेट देणार असून रवाना झाले आहेत.

19 बंगल्याप्रकरणी काय झालंय ते आम्हाला मुख्यमंत्र्यांनीच सांगावं. ते खोटं बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्री साहेब चुका होतात. फक्त जनतेला सांगा की मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

जर बंगले नाहीत तर मग बंगल्यांचा कर कसा भरला जातो, याचा अर्थ बंगले चोरीला गेले का?, असा खोचक सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

बंगल्यांच्या आरोपांवरुवन संजय राऊत आणि सोमय्यां यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे. राऊत आणि सोमय्यांचा वाद वाढत असतानाच आता अनेक यामध्ये उडी घेताना दिसत आहे.

सोमय्या यांनी आज कोर्लईत जाण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोर्लईत आज शिवसेना आणि सोमय्या यांच्यात सामना रंगण्याची चिन्हं आहेत.

उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या 19 बंगल्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी उद्या आम्ही कोरलाई गाव अलिबागला भेट देणार आहोत, असं ट्विट करत सोमय्या रवाना झाले आहेत.

सोमय्या यांच्या दौऱ्यानंतर आता आणखी कोणता नवा वाद उभा राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली होणार असल्याचं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”

  येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

  राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचं सावट, ‘या’ ठिकाणी अनेक पक्षांचा मृत्यू

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; मोदी सरकार लवकर ‘हा’ निर्णय घेणार

 “तीन पक्षांचं सरकार असलं तरी…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य