एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विलीनीकरण अहवालावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी

मुंबई | दिवाळीपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. या आंदोलनाचा त्रास एसटी कर्मचाऱ्यांना तसेच प्रवांशाना होत आहे.

कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावं, अशी मागणी केली होती. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन लांबतच चाललं आहे. काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत तर काही कर्मचारी अजूनही आंदोलन करत आहेत.

एसटी संपावर उपाय म्हणून सरकारने न्यायालयात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यावर आता 22 फेब्रुवारीला निर्णय घेण्यात येणार आहे.

जर हे विलीनीकरण झाले नाही तर कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण जास्त चिघळण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत हे आंदोलक जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने पोलिसांना आदेश दिले आहेत की, आंदोलकांना तिथेच टोलनाक्यांवरच थांबवण्यात यावं.

मुंबईत मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी हे कर्मचारी आंदोलन करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्त वाढवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या विलीनीकरणावर न्यायालय काय निर्णय घेणार आहे, याकडे आता एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

  Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”

  येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

  राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचं सावट, ‘या’ ठिकाणी अनेक पक्षांचा मृत्यू

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; मोदी सरकार लवकर ‘हा’ निर्णय घेणार