केंद्राचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री- भाजप खासदार

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांची केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच फडणवीसांनी 80 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन हे नाटक केलं आणि 15 तासात त्यांनी केंद्राचा हा निधी परत पाठवला, असं हेगडे यांनी म्हटलं आहे.

तुम्हा सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिला. त्यांनी हे सर्व नाटक कशासाठी केलं? आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहिती नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हाच तर प्रश्न आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, भाजपने ही योजना खूप आधीपासून आखली होती. हे सगळे पूर्वनियोजित असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-