मुंबई | रविवारी कर्नाटक विरुध्द तामिळनाडू टी-20 च्या अंतिम सामन्यात बुकीने खेळाडूशी संपर्क साधल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली. यामुळे भारतीय क्रिकेट पुन्हा फिक्सींगच्या सावटाखाली असल्याची कबुली खुद्द सौरभ गांगुलीने दिली आहे.
कर्नाटक प्रिमीअर लिग स्पर्धेमध्ये समोर आलेल्या स्पॉट फिक्सींगप्रकरण तसेच सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत बुकीने खेळाडूशी साधलेला संपर्क यामुळे क्रिकेटजगतात फिक्सींगचे सावट वाढलेले दिसते.रविवारी पार पडलेल्या बीसीसीआय च्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गांगुली बोलत होते.
रविवारी कर्नाटक विरुध्द तामिळनाडू हा टी-20 चा अंतिम सामना पार पडला या सामन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले भारतीय खेळाडू सहभागी झाले होते मात्र यातील कोणत्या खेळाडूशी बुकीने संपर्क साधला याचे नाव सांगण्यास गांगुलीने नकार दिला.
कर्नाटक प्रिमीअर लिग स्पर्धेवर होत असलेल्या आरोपामुळेे बीसीसीआय ने ती तात्पुरती थांबवली आहे. तसेच तामिळनाडू प्रिमिअर लिग स्पर्धेतील दोन संघावर बंदीची करवाई करण्यात आली. क्रिकेट मध्ये होणारे फिक्सींगचे प्रकार भविष्यात थांबले पाहिजेत, त्यासाठी बीसीसीआय आणि आयसीसी प्रयत्नशील आहेत.
महत्वाच्या बातम्या-
भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 80% आरक्षणाची राज्यपालांची अभिभाषणात ग्वाही – https://t.co/IyxAuq5fEA @BSKoshyari #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
अभिनेत्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी ‘या’ मराठी अभिनेत्रीला अटक – https://t.co/q1LlV842Zj #pune
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
NRC प्रमाणं SRC हा कायदा देशात लागू करावा; मनसेची मागणी – https://t.co/UNufQTJ7xp @mnsadhikrut @SandeepDadarMNS @RajThackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019