रांची | महाराष्ट्रातील शिवसेनेत झालेला सत्तासंघर्ष संपूर्ण देशाने अनुभवला. तात्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत सरकार पाडले.
त्यानंतर त्यांनी भाजपच्या मदतीने राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजप राज्यातील सरकारे पाडत सुटले आहे, असा आरोप विरोधकांनी केला. भाजपने मात्र हात वर केले आहेत.
आता झारखंडमध्ये (Jharkhand) देखील तेखील राज्य सरकारला असाच धक्का मिळाला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची निवडणूक आयोगाने (Election Commission) विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस राज्यपालांना पाठविली आहे.
त्यामुळे सोरेन यांची आमदारकी आणि मुख्यमंत्रीपद धोक्यात आले आहे. पण त्यांनी कच न खाता आपल्या आमदारांना घेऊन छत्तीसगढ गाठले. भाजपमधून आमदार फोडले जाऊ नये, म्हणून त्यांनी सर्वांना घेऊन राज्यातून पळ काढला.
सध्या ते आमदारांसोबत छत्तीसगढमधील रायपूरमध्ये आहेत. सध्याचे राजकीय वातावरण पाहता, आमदारांना सुरक्षीतस्थळी ठेवले असल्याची प्रतिक्रिया हेमंत सोरेन यांनी दिली.
भाजपकडून आमदारांना पळविले जाण्याची शक्यता आहे. त्यांना भाजपच्या गोटात ओढण्याची शक्यता आहे, असा आरोप संयुक्त पुरोगामी आघाडीने केला आहे. उद्या 1 सप्टेंबर रोजी रांची येथे पक्षाची कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आली आहे.
त्यामुळे आता आगामी काळात सोरेन आपली आमदारकी वाचवू शकणार का, तसेच झारखंडमध्ये देखील महाराष्ट्रासारखा प्रयोग केला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘पोलीसांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था करा’; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश
पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींवरुन वाद; खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल
अण्णा हजारेंचे अरविंद केजरीवालांना खरमरीत पत्र; वाचा सविस्तर
बाबरी मशीद आणि गुजरात दंगलीवर न्यायालयाचा मोठा निर्णय
पोलीस इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ससून रुग्णालयात दाखल