मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पोलिसांसाठी फिल्डवर उतरल्याचे पहायला मिळाले. मुंबईत मुख्यमंत्र्यांचे निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्याजवळ असलेल्या तोरणा बंगल्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.
या ठिकाणी पोलीस गेली अनेक वर्षे राहतात. पण त्यांना राहण्यासाठी योग्य सुविधा नसल्याचे आढळून आले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तातडिचे निर्देश देत सुधारणा करण्यासाठी सांगितले आहे.
यावेळी त्यांनी आपण पण माणसे आहोत, ते देखील माणसे आहेत. तेव्हा त्यांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था करा, अशा स्वरुपाचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिले.
तोरणा बंगल्यात एकाच ठिकाणी एकाच खोलीत अनेक पोलीस कर्मचारी दाटीवाटीने राहत होते. या खोलिची अवस्था अत्यंत बिकट होती. त्यांना राहण्याची योग्य सोय नसल्याने पोलीस नाराज होते.
त्यासंबंधी त्यांनी तक्रार केली होती. तक्रार मिळाल्यावर खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी तात्काळ खोल्यांची पाहणी केली. तात्काळ पोलीसांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी देखील दिले आहेत.
तोरणा बंगल्यात मागील अडीच वर्षे पोलीस राहत होते. वर्षा बंगला आणि तोरणा बाजूबाजूला आहेत. आणि वर्षा बंगल्यात जाण्यासाठी अगोदर तोरणा बंगल्यातून जावे लागते. या दयनीय जागेची तक्रार पोलिसांनी केल्यावर तात्काळ पाहणी करत मुख्यमंत्र्यांनी डागडुजीचे आदेश दिल्याने पोलीस बांधव यांनी आनंद व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींवरुन वाद; खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल
अण्णा हजारेंचे अरविंद केजरीवालांना खरमरीत पत्र; वाचा सविस्तर
बाबरी मशीद आणि गुजरात दंगलीवर न्यायालयाचा मोठा निर्णय
पोलीस इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ससून रुग्णालयात दाखल
जय शहा यांच्या तिरंगा नाकारण्यावर प्रकाश राज आक्रमक; ट्विट करत म्हणाले,