मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशन आज जोरदार वादळी ठरल्याचं पहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधकांनी तर एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केल्याचं पहायला मिळालं.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय त्यांनी अनेक गोप्यस्फोटही केलेले पहायला मिळाले.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा संबोधित केलं. त्यामुळे विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. अशातच उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली.
उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
आमदारांसाठी 300 घरं बांधणार आहोत, सर्वपक्षीय आमदारांना घरं आवश्यक आहेत, आमदारांनाही चांगल्या घरांची गरज, कायमस्वरुपी घरं देणार, असं मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्राच्या अनेक जागा मुंबईत अशाच पडून आहेत. त्यामुळे या जागांचा निकाल लावायला पाहिजे. या जागांवर मुंबईकरांसाठी घरे बांधन्याची योजना आहे. मुंबईतील बीडीडी चाळ कामाला सुरवात झालीये, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
वर्षानुवर्षे जी लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये रहात आहेत. काबाडकस्ट करताहेत त्यांना घरे मिळवून देण्यासाठी आमचे मंत्री काम करत आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार फक्त माझ्या सरकारने केला. आधीही मुंबईचा विचार केला. मात्र सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोले लगावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल तरी त्यावर ईडी कारवाई करेल”
“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”
पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…
करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ!
“माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता”