मुंबई | उन्हाळा सुरु झाला असून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आता उन्हामुळे शरिराची लाही लाही होत आहे. उष्णतेचा वाढता पारा पाहून हवामान खात्यानं उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा दिला आहे.
अशातच एकीकडे उन्हाची तीव्र लाट सुरु असातना दुसरीकडे मात्र काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. गेले दोन आठवडे सलग तापमानवाढीनंतर राज्यात पावसाचं हवामान निर्माण झालं आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता कमी होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची हजेरी पहायला मिळणार आहे.
उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची शक्यता आहे. या जिल्ह्यात हलक्या सरी बरसणार आहेत, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
उद्यापासून राज्यात ढगाळ हवामानाचा जोर काहीसा कमी होणार असून कमाल तापमानात किंचितशी वाढ होण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
काही ठिकाणी पुढील आणखी चार दिवस कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातील तापमान किंचितसं घटलं आहे. तसेच आज कोकणासह घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालं असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल तरी त्यावर ईडी कारवाई करेल”
“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”
पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…
करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ!
“माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता”