नवाब मलिकांच्या खात्याचा कारभार ‘या’ नेत्यांकडे, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे.

नवाब मलिक सद्यस्थितीत ईडी कोठडीत असल्याने मलिकांकडे असलेली जबाबदारी इतरांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना नवाब मलिक यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे देण्याची शिफारस केली आहे.

यानुसार कौशल्य, रोजगार आणि  उद्योजगता आणि नाविन्यता विभागाची जबाबदारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

नवाब मलिक यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रीपदाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देण्यात आली आहे.  नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने काही निर्णय घेतल्याची माहिती आहे.

नवाब मलिक यांच्याकडील जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडील जबाबदाऱ्या इतरांना देण्याचं काम सुरू आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, नवाब मलिक उपलब्ध होत नाही तोवर त्यांच्याकडे असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि खात्यांची जबाबदारी हे सगळं काम थांबू नये यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याचं आम्ही ठरवलं आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ  

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा! 

“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार” 

डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव 

घर खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुद्रांक शुल्क विभागाने घेतला मोठा निर्णय