बहुप्रतिक्षित ‘KGF Chapter 2’ ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित, पाहा दुसरा ट्रेलर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात चित्रपटांचा ससेमिरा पहायला मिळत आहे. एका मागोमाग अशे अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

चित्रपटांचा धुमाकूळ सुरु असताना अनेक चित्रपट बाॅक्स ऑफिसवर कल्ला करत आहेत. अनेक चित्रपटांची रणधुमाळी सुरु आहे.

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर2’ (KGF 2) चा टीझर अखेर रिलीज करण्यात आला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मिडियावर याबाबतची चांगलीच चर्चा रंगलीये.

गेल्या 3 वर्षांपासून प्रेक्षक सुपरस्टार यशच्या या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. आता हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेक्षकांची लवकरच प्रतिक्षा संपणार असून केजीएफ चॅप्टर 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये यश (Yash), संजय दत्त (Sanjay Dutt), मालविका अविनाश (Malavika Avinash), श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

‘केजीएफ चॅप्टर2’ 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. दुसऱ्या ट्रेलरमध्ये प्रत्येक कलाकाराचा अनोखा अंदाज पहायला मिळत आहे. त्यामुळे ट्रेलर थोडा हटके वाटत आहे.

सुपरस्टार यशचा हा चित्रपट कधी रिलीज होतोय असं प्रेक्षकांना झालं आहे. त्यामुळे चाहते सध्या मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचं दिसत आहे.

पाहा ट्रेलर – 

महत्त्वाच्या बातम्या – 

  “रणजितसिंह नाईक निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नाही, जो माणूस शरद पवारांना…” 

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ  

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा! 

“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार” 

डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव