नवी दिल्ली | रेड वाईन पिणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी रेड वाईन (Red Wine) सर्वोत्तम उपाय (Best Solution) ठरत असल्याचं नव्या संशोधनातून (New Research) समोर आलं आहे.
ज्या व्यक्ती दर आठवड्याला पाच ग्लास किंवा त्यापेक्षा अधिक रेड वाईन पितात, त्यांना इतरांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याचा धोका हा 17 टक्के कमी असतो, असं या संशोधनातून दिसून आलं आहे.
रेड वाईनच्या नियमित सेवनामुळे कोरोना होण्याची शक्यता कमी होते आणि रेड वाईनमध्ये असणारे घटक हे कोरोना विषाणूला संपवण्यासाठी आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात, हे नव्या संशोधनातून दिसून आलं आहे.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार रेड वाईनमध्ये असणाऱ्या पॉलिफेनॉल हा घटक त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. या घटकामुळे कोरोना किंवा श्वसनसंस्थेवर परिणाम करणाऱ्या जातकुळीतील सर्वच व्हायरसचा प्रभाव कमी होत असल्याचं संशोधनातून दिसून आलं आहे.
इतर अल्कोहोलीक द्रव्यांचं सेवन केल्यामुळे कोरोना होण्याची शक्यता कमी होण्याऐवजी ती इतरांपेक्षा 28 टक्के वाढत असल्याचंही या संशोधनातून समोर आलंय.
दरम्यान, शास्त्रज्ञ COVID-19 विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या अलीकडेच सापडलेल्या सब-व्हेरिएंटवर (Sub Variant of Omicron) बारीक लक्ष ठेवून आहेत.
भविष्यात साथीच्या रोगाच्या प्रसारावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे समजू शकेल. अलिकडच्या काही महिन्यांत ओमिक्रॉन प्रकार हा विषाणूचा सर्वात धोकादायक प्रकार बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…मग बघू कोण सरस ठरत ते”; उद्धव ठाकरेंचं थेट अमित शहांना आव्हान
“मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे आणि तलवार जरी हातात नसली तरी…”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा
निधनाच्या अफवांवर लता मंगेशकर यांनीच केलं ट्विट, म्हणाल्या…
येत्या 2 दिवसात ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा
“…तर बाॅलिवूड चित्रपटांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता”; अभिनेत्यानं व्यक्त केली भीती