मुंबई | राज्यपालांच्या जलभूषण या (Governor) नवीन निवास्थानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, द्वारपूजन पार पडलं. बहोत बडा, अच्छा मकान बनाया आपने, एक्सेंज करायचं का, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या समोरच ऑफर दिली.
राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये क्रांती गाथा या भूमिगत दालनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोला लगावला.
‘जसं हे क्रांती भवन उभारलं आहे, तसंच राज्यपालांनी जलभूषण तयार केलं आहे. बहुत बडा अच्छा मकान बनाया है आपने, एक्सेंज करायचं का? मी ते बघतील, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना ऑफरच देऊन टाकली. यावेळी सभागृहात एकच हश्शा पिकली.
स्वातंत्र्य आपण उद्भभोगतोय, त्यांनी देशासाठी घरावर निखारे ठेवले, हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळालं. हे स्वातंत्र्य आपल्याला जपवून ठेवता आले पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हे एक तिर्थस्थळ आहे, महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने आपण एक पुस्तक तयार करत आहोत. स्वातंत्र्यासाठी जे जे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे संकलन व्हावे यासाठी काम हाती घेतले आहे. आपल्या देशासाठी एखादं जरी काम आपल्या हातून घडले तरी ते क्रांतीकारकांच्या बलिदानासाठी कृतार्थ होतील, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्री फडणवीस बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा बोलले नाहीत”
‘ग्लासात ग्लास 36 ग्लास…’; सदानंदरावांसाठी सुप्रिया सुळेंचा वटपौर्णिमा विशेष उखाणा
‘मोदीजी चूक दुरूस्त करा’, अमोल मिटकरी संतापले
मोठी बातमी! अभिनेत्री दीपिका पादुकोनची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल
देहूत अजित पवारांना भाषणाची संधी नाही; सुप्रिया सुळे कडाडल्या, म्हणाल्या…