मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज देहूत शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. मात्र मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसने याचविरोधात विविध शहरात आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते मंडळीही चांगलेच आक्रमक झाले. आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर शरसंधान साधलं. या प्रकरणावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.
अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले नाहीत. तुम्हाला प्रोटोकॉल समजला का? तो शपथविधी आठवावा…., असं ट्विट सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
देहूत नेमकं काय घडलं?
संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र देहू येथे आज पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होईल असं वाटत होतं परंतु सुत्रसंचालकाने थेट नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केलं. आता अजित पवारांना भाषण का करु दिलं नाही याची चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांना भाषणाची संधी का देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अजित पवारांचे भाषण न झाल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हाताने इशारा करुन याबाबत सूचना केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणं हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ग्लासात ग्लास 36 ग्लास…’; सदानंदरावांसाठी सुप्रिया सुळेंचा वटपौर्णिमा विशेष उखाणा
‘मोदीजी चूक दुरूस्त करा’, अमोल मिटकरी संतापले
मोठी बातमी! अभिनेत्री दीपिका पादुकोनची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल
देहूत अजित पवारांना भाषणाची संधी नाही; सुप्रिया सुळे कडाडल्या, म्हणाल्या…
“पंकजा मुंडेंचा राजकीय एनकाऊंटर करण्याचा भाजपमधून प्रयत्न होतोय”