पुढील 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | येत्या 48 तासांमध्ये संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापून विदर्भातील काही भागांमध्ये मान्सून (Mansoon) दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

पश्चिम किनार्‍यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली येत्या 5 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये पावसाची उपस्थिती असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई आएमडीनुसार, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणात सलग 18 जूनपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गोव्यातही पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातही संपूर्ण आठवडा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काही ठिकाणी सर्वदूर पावसाची शक्यता आहे. मान्सूनला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि उर्वरित महाराष्ट्रात चांगल्या मान्सूनच्या पावसासाठी हवी असलेली आवश्यक ऊर्जा पुरवण्यासाठी ही स्थिती अनुकूल आहे, असे मत निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज्यपालांना ऑफर, म्हणाले… 

“मुख्यमंत्री फडणवीस बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा बोलले नाहीत” 

‘ग्लासात ग्लास 36 ग्लास…’; सदानंदरावांसाठी सुप्रिया सुळेंचा वटपौर्णिमा विशेष उखाणा 

‘मोदीजी चूक दुरूस्त करा’, अमोल मिटकरी संतापले

मोठी बातमी! अभिनेत्री दीपिका पादुकोनची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल