कोरोनाविषयी मुख्यमंत्र्यांचं सूचक आवाहन, म्हणाले…

मुंबई | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षात हाहाकार माजवला होता. संपूर्ण जगावर या महासाथीच्या रोगाचा गंभीर परिणाम पहायला मिळाला.

काही दिवसांपासून कोरोनापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांमध्ये आणि शिथिलता करण्यात आली आहे. याशिवाय मास्कसक्तीही हटवण्यात आली आहे.

कोरोना नियंत्रणात येत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुन्हा चिंतेचं सावट पहायला मिळत आहे.

वाढता कोरोना संसर्ग पाहता आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक आवाहन केलं आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली, तरी करोना पूर्णपणे गेलेला नाही, हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज्याचे साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचे प्रमाण 1.59 टक्के असून, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी ! केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल

  Gold Rate | सोने-चांदीच्या दरात वाढ, वाचा ताजे दर

  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट आली समोर!

  “स्वाभिनाने जगणारा संभाजी छत्रपती आहे, कोणासमोर झुकून मी खासदारकी घेणार नाही”

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरेंनी सांगावं की मी…”