खासदार नुसरत जहाँच्या घरी चिमुकल्याचं आगमन!

मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आहेत. पती निखिल जैनपासून त्या विभक्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे. अशातच आता नुसरत जहाँ यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 

नुसरत यांना बुधवारी रात्री कोलकाताच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अभिनेता यश दासगुप्ताने नुसरत यांना रुग्णायलामध्ये भरती केल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या प्रसुतीची तारीख ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीची होती. मात्र लेबर पेनमुळे त्यांना 25 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करावं लागलं.

आता 26 ऑगस्ट रोजी नुसरत यांनी एका मुलाला जन्म दिला असल्याचं समोर आलं आहे. नुसरत आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी नुसरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

नुसरत हिच्या प्रेग्नंसी बद्दल निखिल जैन यांनी असे म्हटलं की, त्याला याबद्दल काहीच माहिती नाही. याच काळात अभिनेता यश दासगुप्ता सोबत नुसरत हिचे अफेअर सुरु असल्याची बाब समोर आली होती. मात्र दोघांनीही याविषयी काहीही सांगितलेलं नाही.

डिलिव्हरीच्या काही तास आधी नुसरत जहाँने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात तिनं लिहिलं, ‘भीतीच्या वर विश्वास’. सध्या सोशल मीडियावर या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत असलेला पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नुसरत ही बंगालची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने असुर, एसओएस कोलकाता, क्रिसक्रॉस, बोलो दुग्गा मॅकी, हरिपदा बंडवाला आदी अनेक बंगाली चित्रपट केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

कोरोनाच्या भीतीनं चक्क माकडानंही लावला मास्क, पाहा व्हिडीओ!

आता अलेक्सावर ऐकायला मिळणार अमिताभ बच्चन यांचा आवाज

बाॅयकाॅटनंतर पुन्हा एकदा राधिकाचा बोल्ड लूक; सोशल मीडियाचं तापमान वाढवलं

बॉयफ्रेंडच्या भरवशावर तिने झाडावरून उलटी उडी मारली अन्…; पाहा व्हिडीओ

दीपिका लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? परिणिती चोप्रा म्हणाली…