भारतानं अमेरिकेला साथ दिली तर…; चीनची भारताला धमकी

बीजिंग | चीनचा विरोध करण्यासाठी भारतानं अमेरिकेला साथ दिली तर चीन आपल्या हितांचे रक्षण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, मग ते राजकीय असेल किंवा आर्थिक, असा इशारा चीनने भारताला दिला आहे.

भारत आणि चीनदरम्यान सीमेवरीव तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे चीन आपल्या सरकारी वृत्तपत्रातून भारतविरोधी गरळ ओकताना दिसत आहे.

भारत आपल्या धोरणांचं पालन करावं आणि अमेरिकेपासून दूर राहावं, असं चीनने ग्लोबल टाईम्समध्ये म्हटलंय. तसंच दोन्ही देशांमधील तणावाचं वातावरण कमी होत असल्याच्या काही विश्लेषकांच्या वक्तव्यांचीदेखील यात प्रशंसा करण्यात आली आहे.

जर राजकारणाचा अर्थव्यवस्था आणि व्यवहारावरील परिणाम पाहिला असता तर द्विपक्षीय व्यापारावर नक्कीच प्रभाव जाणवला असता कारण भारतातही चीनविरोधी भावना वेगानं वाढत आहेत, असंही ग्लोबल टाईम्समध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण शांत बसून कसं राहणार?- चंद्रकांत पाटील

-लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, गर्दी करु नका स्वतःची काळजी घ्या- उद्धव ठाकरे

-“कोरोनाशी लढा देण्यासाठी देशात आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवावा”

-आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही- सर्वोच्च न्यायालय

-“पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर न घेणं हा माझ्यासाठी मोठा धक्का होता”