बहिष्कार तर दूरच पण तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही, चीनने भारताला ललकारलं

नवी दिल्ली |  चिनी वस्तूच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे व सरकारला आता त्यावर निर्णय घ्यावाच लागेल, अशी मागणी आता व्हायला लागलेली असताना अशातच चीनने भारताला ललकारलं आहे. याच पार्श्वभूमीवर बहिष्कार तर दूरच पण तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही, असं म्हणत चीनने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं याधीही भारतावर अनेकदा निशाणा साधला आहे. आज पुन्हा एकदा एका लेखाच्या माध्यमातून त्यांनी भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. काही भारतीयांमुळे देशात चीन विरोधी भावना निर्माण होत असल्याचा आरोप ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या एका लेखातून करण्यात आला आहे.

सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न जाणूबूजून केला जात आहे. चीनची उत्पादनं सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणं कठिण आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल, असं चीनने म्हटलं आहे.

सीमेवर भारत आणि चीनदरम्या असलेला तणाव हा गंभीर नाही आणि दोन्ही देश यावर चर्चा करत आहेत. परंतु काही भारतीय माध्यमं आणि काही भारतीय चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं शांघाय इन्सिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे झाओ जेनचेंग यांनी या लेखात म्हटलं आहे.

दुसरीकडे एका बाजूला ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे ढोल पिटायचे व दुसर्‍या बाजूला चीनची बाजारपेठ खुली ठेवायची. यातून चीनला आर्थिक बळ मिळते. कोरोनामुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था संपली आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

केंद्र सरकारच्या या धोरणामुळेच बेरोजगारी वाढली आहे आणि हिंदुस्थान-चिनी मालाची बाजारपेठ खुली करून चीनच्या राक्षशी महत्त्वाकांक्षेला आणि साम्राज्यवादालाच ताकद देत आहे. चिनी वस्तूच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे व सरकारला आता त्यावर निर्णय घ्यावाच लागेल, असं अग्रलेखाच्या सरतेशेवटी राऊत म्हणाले.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“आत्मनिर्भर भारतचे ढोल पिटायचे अन् दुसरीकडे चीनची बाजारपेठ खुली ठेवायची, त्यानेच अर्थव्यवस्था संपली”

-दहावी बारावीच्या निकालासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा, पाहा कधी लागणार निकाल…

-“सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत हे चीनला दाखवून द्यायची हीच ती वेळ”

-“उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले हेच फडणवीसांना खुपतंय”

-“…म्हणून भारतात कोरोनाचा स्फोट होणार, जून अखेरपर्यंत देशात 16 लाख कोरोनाबाधित होतील”