“फेकलेल्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी दुसऱ्यांचे तुकडे करायची भाषा करू नये”

मुंबई | मुंबईतल्या बीकेसीत शिवसेनेची जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केलीये.

देवेंद्रजी, बाबरी पाडली तेंव्हा तुमच वय काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती? आज मी तुम्हांला विचारतो, तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं? तुम्ही बाबरी पाडायला गेला नव्हता. देवेंद्र जर बाबरी पडण्यासाठी तुम्ही गेला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती, असा टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. याला आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अत्यंत घटिया मानसिकतेचा मुख्यमंत्री अशी इतिहासात तुमची नोंद होईल सन्माननीय उद्धव ठाकरेजी, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

संघ एकदाही भारताच्या स्वातंत्र लढ्यात नव्हता, कुठे होता संघ लढ्यावेळी?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. यावर स्वातंत्र्य लढ्यात फाशी किंवा अंदमानला गेलेल्या एखाद्या ठाकरेंचं नाव सांगाल का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय.

फेकलेल्या तुकड्यांवर जगणाऱ्यानी दुसऱ्यांचे तुकडे करायची भाषा करू नये, असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

जगाने आणखी एक दिग्गज गमावला; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू 

‘घरी आई वडील आहेत की नाही…’; केतकी चितळेला उद्धव ठाकरेंनी सुनावलं

“मी काँग्रेसमध्ये उघड गेलो, तुमच्या सारखं पहाटे नाही गेलो” 

“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” 

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…