“मुख्यमंत्री महोदय, तुम्ही सरकार तालिबान्यांना चालवायला दिलंय का?”

मुंबई | भाजप नेते आशिष शेलार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आता या प्रकरणावर भाष्य करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार टीकास्त्र सोडलं आहे.

आशिष शेलार यांना धमकी देऊन कित्येक तास उलटले तरी कायदा सुव्यवस्था सुस्त पडली आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही सरकार तालिबान्यांना चालवायला दिलंय का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.

राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे राज्यामध्ये सरकार नावाची कोणती गोष्ट शिल्लक आहे का? मुख्यमंत्री स्वतः हॉलिडे मूडमध्ये आहेत तर गृहमंत्री विकेंड मूडमधून बाहेर आलेले नाहीत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती.

राज्यामध्ये कशाप्रकारे अंधाधुंदी चालू असल्याचं आपण पाहत आहे. त्यामुळे 24 तासांच्या आत आशिष शेलार यांना ज्याने धमकी दिली आहे त्याच्या मुसक्या आवळा. शेलार आणि त्यांच्या परिवारातील सदस्याला काही झालं तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर असणार आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

दरम्यान, भाजप नेते अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दिली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे शेलार यांना धमकी देण्यात आली होती. त्यात कारवाई करून पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केली होती.

भाजपचे नेते आशिष शेलार यांना फोनवरून धमकी मिळाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

शेलार यांना अज्ञात व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन आले. शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच अर्वाच्च भाषा वापरली. या प्रकारानंतर शेलार यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दिली आहे. शेलार आणि कुटुंबीयांना एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

ज्या मोबाइल क्रमांकांवरून धमकी देण्यात आली होती, त्या दोन्ही क्रमांकांची माहिती देऊन याचा तपास करावा, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले… 

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार

झटपट वजन कमी करायचंय? मग हिवाळ्यात भाकरी खा… होतील फायदेच फायदे

सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत रश्मिकाचं नाव, एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ कोटी