विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर चित्रा वाघ अडचणीत

मुंबई | ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बलात्कार पीडितेच्या गंभीर आरोपांमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ पुन्हा एकदा अडचणीत सापडल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी बलात्काराची खोटी तक्रार द्यायला लावली असल्याचा आरोप एका बलात्कार पीडितेने केला आहे. चित्रा वाघ यांच्यावर यापूर्वीही असे आरोप झाले आहे.

या आरोपांनंतर राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या बलात्कारांच्या आरोप प्रकरणाला आता नवीन वळण लागलं आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

चित्रा वाघ यांच्यासोबतच भाजप आमदार सुरेश धस यांचादेखील या प्रकरणात सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्यासह सुरेश धस यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

मीडियासमोर कसं बोलायचं हे चित्रा वाघ यांनी शिकवलं असल्याचं पीडितेचं म्हणण आहे. तर सुरेश धस यांनी जे लिहुन दिलं तेच मीडियासमोर बोलले असल्याचा दावा पीडितेने केला आहे.

या प्रकरणातील पीडिता खासगी क्लासेस घेत असून मेहबूब शेख यांनी तिला नोकरीचं अमिष दाखवलं. तसेच एका ठिकाणी बोलवून गाडीत तिच्यावर अत्याचार केला व हे प्रकरण कोणालाही न सांगण्याची धमकी दिली, असे आरोप काही महिन्यांपूर्वी या पीडितेने केले होते.

दरम्यान, पीडितेने आता चित्रा वाघ यांनीच मला धमकावलं असल्याचा आरोप केल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पीडितेने केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे चित्रा वाघ यांच्या अडचणीत भर पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“10 तारखेला महाविकास आघाडीच्या पत्त्याचा बंगला हलला, आता 20 तारखेला कोसळणार”

किर्तनावेळी व्हिडीओ शुटींग करणाऱ्याला इंदुरीकर महाराजांचा सज्जड दम, म्हणाले…

भाजपला धक्का देत ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

“अग्निपथ योजना म्हणजे सरकारचं दिशाहीन पाऊल”

‘हे बदल म्हणजे आभाळाला ठिगळ लावल्यासारखं’, रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका