नवी दिल्ली | सोशल मीडियावर सातत्यानं काहीतरी व्हायरल होत असतं. कधी चांगलं तर कधी वाईट असं दोन्ही बाजूंनी व्हायरल होण्याचं प्रमाण आता वाढलं आहे. अशात आता एक खूप महत्त्वाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यापासून प्रत्येक गोष्ट लवकर होण्याची एक सवय सर्वांना लागत आहे. अशात प्रत्येकजण अधिक निष्काळजी होत असल्याचंही पहायला मिळत आहे. परिणामी धोकाही वाढत आहे.
सध्या नवी दिल्ली मेट्रो स्थानकातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. गर्दी असल्यावर गर्दीच्या ढकलल्या जाण्यानं अथवा रेल्वे पकडण्याच्या नादात रेल्वे ट्रॅकवर पडण्याची अनेक प्रकरणं आहेत. पण गर्दी नसताना निष्काळजीपणे एक व्यक्ती ट्रॅकवर पडला आहे.
दिल्ली मेट्रो स्थानकावरील एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी रात्री 8.23 च्या सुमाराचा आहे. जिथे त्याच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशाचा मृत्यू झाला असता. पण वेळीच सीआयएसएफच्या क्विक रिसपाॅन्स टीमने त्या प्रवाशाचे प्राण वाचवले.
सीसीटीव्ही व्हिडीओ दिल्लीतील शाहदरा मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचा आहे. जिथे एक प्रवासी फोनवर बोलण्यात व्यस्त होता. त्यानंतर अचानक तो रुळावर पडला. त्या प्रवाशाचा पाय हा खड्यात अडकल्यानं त्याला वर निघता येत नव्हतं.
अशात परिस्थितीत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सीआयएसएफच्या जवानांच्या टीमनं लागलीच मदत करण्यासाठी धाव घेतली. जवानांच्या गटातील एक जवान ट्रॅकवर ताबडतोब उडी मारून त्या प्रवाशाला वाचवतो.
सीआयएसएफचा कॉन्स्टेबल रोहतास याने रुळावर उडी मारली आणि पडलेल्या प्रवाशाला शैलेंद्र मेहता यांना रुळावरून उचलून फलाटावर नेले. काही सेकंद उशीर झाला असता, तर कुठेतरी मेट्रोच्या धडकेने प्रवाशाला जीव गमवावा लागला असता.
दरम्यान, प्रवाशाचे प्राण वाचवल्यामुळं जवानाचं सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ड्यूटी असेल त्या ठिकाणी नागरिकांच्या जिवाचं रक्षण करणं हे काम जवान निष्ठेनं करतात याचं हे उदाहरण आहे.
पाहा व्हिडीओ –
Dilli Metro प्लेटफॉर्म..फोन पर बात करते हुए चल रहा था यात्री.. अचानक गिर पड़ा मेट्रो ट्रेन ट्रेक पर..अलर्ट CISF QRT ने बचाई जान… @ZeeNews @capt_ivane@CISFHQrs @OfficialDMRC @LtGovDelhi pic.twitter.com/szLWUxhKYV
— Neeraj Gaur (@NeerajGaur_) February 5, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ
आमदार नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार
मोठी बातमी! लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
‘या’ महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपणार; ICMR ने दिली महत्वाची माहिती