लातूर : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मेगागळती सुरु आहे, मात्र भाजपमध्ये मेगाभरती नाही. ठराविक नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. महाजनादेश यात्रेनिमित्त लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
भाजप तरी निवडक लोकांनाच प्रवेश देत आहे. युतीचा विचार करुनच पक्षप्रवेश सुरु राहतील. एखाद-दुसऱ्या जागेचा प्रश्न निर्माण झाला, तरी आम्ही सोडवू. मात्र तिकीट द्यावे लागतील असे चार जणच घेतले आहेत. फार तर आणखी चार-पाच घेऊ, बाकी तर पक्षात घेतच राहू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मूळ भाजप 97-98 टक्के आहे, घेतलेले लोक 2-3 टक्केच आहेत. त्यामुळे फार फरक पडणार नाही. शक्तीसंचय केलाच पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल शिवसेनेलाच माहिती, आम्ही काय त्यांना घेत नाही, असं म्हणत फडणवीसांनी हात झटकले.
महत्वाच्या बातम्या-
बुम बुम बुमराहची भेदक गोलंदाजी.; केला ‘हा’ नविन विक्रम – https://t.co/c3VukRAIH9 @Jaspritbumrah93
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतरही गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब! – https://t.co/80ndoVCFby @supriya_sule @NaikSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
राणा जगजितसिंह यांच्या पक्षांतरावर ओमराजे म्हणातात… –https://t.co/QDgOBJ8DQz @ShivsenaComms @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019