…म्हणून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेआधी शेतकऱ्यांना घेतलं ताब्यात!

नाशिक | परदेशातून कांदा आयात करण्याच्या निर्णयाला विरोध करत शेतकऱ्यांनी आणि विविध संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा अडवण्याचा इशारा दिला आहे. मात्र या आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काही जणांना ताब्यात पोलिसांनी घेतलं आहे. तर काहींना स्थानबद्ध केलं आहे.

काल रात्री उशिरा 15 जणांना स्थानबद्द करण्यात आलं आहे. तर परिवर्तनवादी संघटना, आप युवा आघाडी, प्रहार जनशक्ती, छात्रभारती संघटनांनी गनिमी काव्यानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह 22 जणांना आज पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतं. दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या 62 जणांना स्थानबद्ध केल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज नाशिकमध्ये आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा उद्या नाशिकमध्ये होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून 125 आंदोलकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

पाकिस्तानसह इजिप्त, चीनमधून कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदेफेक करण्याचा तसेच यात्रा अडवण्याचा इशारा शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी दिला आहे.

दरम्यान, परदेशी कांदा आयात करू नये. त्यामुळे आमच्या कांद्याला भाव मिळत नाही, अशा भावना नाशिक भागातल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा आहेत. 

महत्वाच्या बातम्या-