बीड | विधानसभा निवडणुकीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आघाडीच्या जागावाटपावर चर्चा झडून जागांचा वाद निकाली निघाला आहे. तर भाजप-सेनेचं आणखी चर्चेचं गुऱ्हाळं सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बीडमध्ये बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
पवारांनी जाहीर केलेल्या नावांमध्ये परळीमधून धनंजय मुंडे, गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळंके यांच्या नावाची घोषणा शरद पवारांनी केली आहे.
2014 ला फक्त बीडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी बाजी मारली होती. परळीसह बाकीच्या जागांवर राष्ट्रवादीला पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून भाजपच्या पंकजा मुंडे, गेवराईमधून लक्ष्मण पवार, माजलगावमधून आर. टी. देशमुख, आष्टीमधून भीमराव धोंडे, केजमधून संगीता ठोंबरे या पाच जणांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना धूळ चारली होती.
दरम्यान, विधानसभा निवणुकीचं बिगूल वाजायचं अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सगळेच पक्ष तयारीला लागलेत. राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर झाल्याने बीड जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीच्या पहिल्या पाच उमेदवारांची नावं शरद पवारांनी केली जाहीर!https://t.co/9jGO6KbFPX @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
परळीचा उमेदवार ठरला…! शरद पवारांनी जाहीर केलं नाव https://t.co/lJODOMHtLh @dhananjay_munde @NCPspeaks #Vidhansabha
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
महाजनादेश यात्रा चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरात; रस्त्यावर मात्र शुकशुकाट https://t.co/yRR9bn5jhq @ChDadaPatil #MahaJanadeshYatra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019