मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार; ‘या’ दोन नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारमध्ये वारंवार खटके उडताना दिसत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न गेल्या दीड वर्षापासून चर्चेत आहे.

ठाकरे सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची शिफारस करुन तब्बल दीड वर्षे पुर्ण झाला आहे. तरी अद्याप राज्यपालांकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना नवी यादी पाठवणार आहेत. एबीपी माझाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

ठाकरे सरकारने याआधी पाठवलेल्या यादीतील काही नावांवर राज्यपालांचा आक्षेप होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि महाविकास आघाडीची साथ सोडणारे राजू शेट्टी यांची नावं वगळण्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शरद पवारांनी पतप्रधानांकडे राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, 12 आमदारांच्या यादीतून नाव वगळ्यानंतर आता खडसेंकडे मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांची नाव वगळणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकार नाराज देखील होते. त्यानंतर आता त्यांचं नाव देखील वगळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुनव्वर फारुकीने शोमध्ये अंजलीसोबत केलं असं काही की…; व्हिडीओ तुफान व्हायरल

 चेहऱ्यावर स्मित हास्य अन् डोळ्यात पाणी; हवाई सुंदरीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

“दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ