लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, गर्दी करु नका स्वतःची काळजी घ्या- उद्धव ठाकरे

मुंबई | लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, मात्र गर्दी न करता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.

कुठेही गर्दी करु नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या, असं ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ठाकरे सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’चा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. कंटेन्मेंट झोन वगळता सर्वत्र पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या सवलती तिसऱ्या टप्प्यात कायम राहतील.

 

महत्वाच्या बातम्या-

-“कोरोनाशी लढा देण्यासाठी देशात आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवावा”

-आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही- सर्वोच्च न्यायालय

-“पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर न घेणं हा माझ्यासाठी मोठा धक्का होता”

-‘मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका तर…’; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

-‘मनसेकडून शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान’; शिवसेनेसह इतर संघटनांचा आरोप