“कोरोनाशी लढा देण्यासाठी देशात आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवावा”

नवी दिल्ली | देशामध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवावा, अशी शिफारस आयसीएमआरने एका सर्वेक्षणाच्या निष्कर्षांच्या आधारावर केली आहे.

कोरोनाशी देशाला आणखी एक महिना सामना करावा लागणार आहे हे सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांना कोरोनापासून मोठा धोका आहे, असं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.

देशातील हॉटस्पॉट असलेल्या एक तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. अनेक रूग्ण कोणतेही उपचार न घेता बरे झाले आहेत. त्यांच्या शरीरातून प्रभावी अँटीबॉडीज मिळाल्या आहेत, असं बलराम भार्गव यांनी सांगितलंय.

दरम्यान, कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येच्या तुलनेत कंटेनमेंट क्षेत्रात साथीचा झालेला फैलाव 100 ते 200 पट अधिक आहे. मुंबईसारख्या शहांमध्ये हीच स्थिती आहे, असं भार्गव यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही- सर्वोच्च न्यायालय

-“पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर न घेणं हा माझ्यासाठी मोठा धक्का होता”

-‘मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका तर…’; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

-‘मनसेकडून शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान’; शिवसेनेसह इतर संघटनांचा आरोप

-तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज; ‘इतक्या’ वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी