नारायण राणेंच्या अडचणीत वाढ! शिवसेनेने केली महिला आयोगाकडे तक्रार

मुंबई | राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तेव्हापासून हा वाद वाढला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोप राऊत यांनी केला होता.

संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. राणेंनी आरोप करताना सुशांत सिंह आणि दिशा सालियान प्रकरणांचा उल्लेख केला होता.

दिशा सालियान प्रकरणाचा उल्लेख करताना राणेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्यावर शिवसेना नेत्यांनी शाब्दिक प्रहार केले.

शिवसेने नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत राणे यांच्याविरोधात दिशा सालियानची बदनामी केल्याबद्दल तक्रार करणार असं सांगितलं होतं.

किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडं तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनूसार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस तपासाचे आदेश दिले आहेत.

मालवणी पोलिसांना यांबाबत 48 तासांत तपास करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत, असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, महिला आयोगाकडून दिशा सालियान प्रकरणाबाबत दखल घेतली असल्यानं आता नारायण राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यातील राजकारण पेटणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “सैन्य तयार ठेवा, 2024 मध्ये आपल्याला जिंकायचंय”

खुशखबर! यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार, सरासरीच्या 104 टक्के पाऊस होणार!

कोरोनाच्या चौथ्या लाटेवर राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

EPFO कडून खातेधारकांना अलर्ट जारी, तुम्हीही ‘या’ चुका करू नका

“…त्यामुळे भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही”, अमित शहांनी सांगितलं कारण