मुंबई | आर्थिक वर्ष 2021-22 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. याआधी काही महत्त्वाचे काम पूर्ण करणे खूप गरजेचं आहे. हे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण न केल्यास नवीन आर्थिक वर्षात अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
आज आम्ही तुम्हाला अशी 5 महत्त्वाची कामं सांगणार आहोत. जी 31 मार्चपर्यंत पूर्ण करणं गरजेचं आहे. तुम्ही 31 मार्च 2022 पूर्वी आयकराशी संबंधित फॉर्म-12 बी भरून तुमच्या उत्पन्नाची माहिती तुमच्या कंपनीला द्यावी.
आयकर कायद्याच्या कलम 208 नुसार, कोणत्याही करदात्याचे अंदाजे करदायित्व 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक आहे, तो सर्व आगाऊ कर जमा करू शकतो. त्याची अंतिम तारीख 15 मार्च होती. मात्र, आता त्याची तारीख 31 मार्चपर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे.
बँक खात्यांमध्ये केवायसी तपशील अपडेट करण्याची अंतिम तारीख 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. योग्य ती कागदपत्रे देऊन केवायसी केलं नाही तर बॅक अकाऊंट फ्रीज होऊ शकतं.
तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड टाळायचा असेल तर 31 मार्चपूर्वी तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करा. अन्यथा तुमचं पॅनकार्ड अवैध ठरण्याची शक्यता आहे.
तुम्ही विवाद से विश्वास योजनेचा लाभ 31 मार्चपर्यंत घेऊ शकता. या योजनेअंतर्गत, तुम्हाला थकित करावरील दंड आणि व्याजातून सवलत मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तुमच्या टॅक्स रिटर्नमध्ये काही चूक असल्यास, तुम्ही 31 मार्चपूर्वी सुधारित प्राप्तिकर रिटर्न देखील भरू शकता.
महत्त्वाच्या बातम्या –
आर्चीचा फोटो पाहून परश्या दिवाना, अशी कमेंट केली की… झाले सगळेच सैराट
नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार भारतीयांना नोकरी
Deltacron: डेल्टाक्राॅनमुळं टेन्शन वाढलं! जाणून घ्या किती धोकादायक आणि काय आहेत लक्षणं?
राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका! विशेषाधिकार वापरत रद्द केला ‘तो’ मोठा निर्णय
सर्वात मोठी बातमी; कोरोनाबाबत WHO चा जगाला अत्यंत गंभीर इशारा