नितेश राणेंना कोर्टाचा दिलासा; या 3 अटींवर जामीन झाला मंजूर

सिंधुदुर्ग | काँग्रेस आमदार नितेश राणे यांना अधिकाऱ्यावरील चिखलफेक प्रकरणात ओरोस जिल्हा न्यायालयाने दिलासा दिला आहे. नितेश राणे यांना ओरोस जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

कणकवली दिवाणी न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपींना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याचविरोधात नितेश राणे यांनी ओरोस जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. ओरोस न्यायालयाने सरेव आरोपींना 20 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

नितेश राणे यांच्या बाजूने वकील संग्राम नाईक यांनी त्यांची बाजू मांडली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला परंतू जामीन मंजूर करताना त्यांना काही अटी सुद्धा घातल्या आहेत.

या तीन अटींवर नितेश राणे यांना सशर्त जामीन मंजूर-

  1. अशा पद्धतीचा गुन्हा पुन्हा होणार नाही.
  2. प्रत्येक रविवारी कणकवली पोलिस स्थानकात हजेरी
  3. तपास कार्यात सहकार्य करावे लागेल.

उपअभियंत्याला मारहाण प्रकरणी कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये आमदार नितेश त्यांच्या कार्यकर्त्यांविरूद्ध 353, 342, 143, 148 आणि 149 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नितेश राणे, मिलिंद मिस्त्री, निखिला आचरेकर, मामा हळदिवे, मेघा गांगण यांचा समावेश आहे.

नितेश राणे यांना राष्ट्रवादी आणि मनसेने पाठिंबा दिला आहे. नितेश राणे यांच्या समर्थनार्थ मनसे आणि राष्ट्रवादी 16 जुलै रोजी जेलभरो आंदोलन करणार आहेत.