नाव शेतकऱ्यांचं, पैसा जनतेचा आणि तुंबड्या भरल्या कंत्राटदारांच्या; जलयुक्त शिवारवर काँग्रेसची टीका

मुंबई |  फडणवीस सरकारच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेवर काँग्रेसने टीकास्त्र सोडलं आहे. नाव शेतकऱ्यांचं, पैसा जनतेचा आणि तुंबड्या भरल्या कंत्राटदारांच्या, अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारच्या जलयुक्त शिवारवर टीका केली आहे.

भाजप सरकारची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना, नेमक्या कोणाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करत होती हे ‘द युनिक फाऊंडेशन’ संस्थेच्या संशोधनावरून स्पष्ट झाले आहे, असं म्हणत योजनेचा फायदा मोठ्या शेतकऱ्यांना आणि कंत्राटदारांना झाला आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

2016 ते 2019 पर्यंत अर्थसंकल्पानुसार सुमारे 7 हजार कोटी रूपये खर्च झाला आहे. प्रत्यक्षात किती खर्च झाला आहे हे भाजपकडून जाहीर नाही, असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

गावांची निवड सदोष पद्धतीने झाल्याचे अभ्यासाअंती निदर्शनास आल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. ट्वीट करत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-भीमा कोरेगावप्रकरणात शरद पवार यांची साक्ष होणार

-फक्त सरपंचच नाही तर मुख्यमंत्रीदेखील जनतेतून पाहिजे; अण्णा हजारेंची मागणी

-‘कर्ज फिटलं साहेब, पोरीच्या लग्नाला या’; अजितदादांचा आपुलकीचा प्रश्न… कुठं दिलं लेकीला?

-अजित पवार यांच्याकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी

-70 वर्ष काय केलं? हा प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रम्प यांनी भाषणातून उत्तर दिलंय- अशोक चव्हाण