नवी दिल्ली | जगभरात कोरोनाची वाढणारी रूग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. अनेक देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याने सर्वच देशांची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटने अनेक देशात हात पाय पसरायला सुरूवात केली. वाढती आकडेवारी पाहाता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉनबद्दल गंभीर इशारा दिला आहे.
ओमिक्रॉनचा धोका अजूनही अधिकच असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे ओमिक्रॉन अधिक वेगाने पसरण्याची भीतीही जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.
‘सध्या ओमिक्रॉनबाबतचा धोका अजूनही अधिकच आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक फैलावत आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांत रूग्णसंख्या दुप्पट होत आहे’, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याने अनेक देशांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या देशात ब्रिटन आणि अमेरिकेचाही समावेश आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या साप्ताहिकात दिली आहे.
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात ओमिक्रॉनचा फैलाव झाला होता. पण दक्षिण आफ्रिकेतही रूग्णसंख्येत घट होत असल्याची दिलासादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, डेन्मार्कमधील आकडेवारीनुसार, डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची बाधा झाली तर रूग्णांची रूग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, याबद्दल काही ठोस निष्कर्ष देण्यासाठी आणखी आकडेवारीची आवश्यकता असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं मत आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर
“पंतप्रधानांनीच अशा चुका केल्या तर त्यांना कोणता बूस्टर डोसही वाचवू शकत नाही”
टाटाच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट