अहमदाबाद | १९ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे आमदार बृजेश मेरजा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसला गुजरातमध्ये सातत्याने धक्के बसत आहेत, याआधी काँग्रेसच्या अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. मार्चपासून आतापर्यंत काँग्रेसच्या तब्बल ७ आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत.
गुजरातमध्ये काँग्रेसकडे आता ६५ आमदारांचं संख्याबळ आहे. यापार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी १९ जूनला होत असलेल्या निवडणुकीला मोठं महत्त्व आलं आहे. ४ पैकी ३ जागा सध्या भाजपकडे तर उर्वरित एक जागा काँग्रेसकडे आहे.
भाजपाने राज्यसभेसाठी अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा आणि नरहारी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. आकडेवारीकडे पाहिली तर भाजपाच्या २ जागा सहज निवडून येतील पण तिसऱ्या जागेसाठी काही मतांची आवश्यकता भासणार आहे, त्यामुळे येत्या काळात गुजरातच्या राजकारणात आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गर्भवती हत्तीण मृत्यू प्रकरणात प्रशासनाच्या जोरदार हालचाली; केली ‘ही’ धडक कारवाई!
-वाढदिवस स्पेशल | नरेंद्र मोदींसोबत पंगा घेणारा माणूस; काय घडला होता नेमका प्रकार?
-RTI अंतर्गत PM केअर फंडाबाबत विचारले होते प्रश्न; PM कार्यालयाने उत्तरं दिली नाहीत!
-लोकांचा अंत सरकारने पाहू नये, वीस लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी- प्रकाश आंबेडकर
-नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रोरो बोटीतून आलिबागकडे रवाना