तिरुअनंतपुरम | केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाच्या पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या प्रकरणी केरळमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. केरळ वनविभागाने ही अटक केली आहे.
ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच हत्तीणीच्या मृत्यूसंदर्भात तीन संशयितांची चौकशी केली जात असून अन्य दोन संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
१५ वर्षीय हत्तीणीला फटाक्यानं भरलेलं अननस खाऊ घातल्यानंतर ही हत्तीण जखमी झाली होती. ती वेलियार नदीच्या पाण्यात उतरली होती. २७ मे तिचा मृत्यू झाला. हे प्रकरण सोशल मीडियात जोरदार व्हायरल झालं होतं. देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता.
दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपी सुमारे ४० वर्षांचा असून तो स्फोटके पुरवण्याचे काम करतो, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. या प्रकरणात केलेली ही पहिलीच अटक आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वाढदिवस स्पेशल | नरेंद्र मोदींसोबत पंगा घेणारा माणूस; काय घडला होता नेमका प्रकार?
-RTI अंतर्गत PM केअर फंडाबाबत विचारले होते प्रश्न; PM कार्यालयाने उत्तरं दिली नाहीत!
-लोकांचा अंत सरकारने पाहू नये, वीस लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी- प्रकाश आंबेडकर
-नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रोरो बोटीतून आलिबागकडे रवाना
-पुणे जिल्ह्यातील पंचनामे लगोलग पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश