“नाना पटोलेंची जीभ… 1 लाख रूपये बक्षिस देणार”; भाजप नेत्याची खुली धमकी

मुंबई | राज्याच्या राजकारणात आणि वातावरणात सध्या एकाच नावाचा धुमाकूळ चालू आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मोदींबद्दलच्या वक्तव्यानंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

नाना पटोले यांनी भंडारा येथे एका सभेत बोलताना भाजपवर टीका करण्याच्या नादात मोदींवर वादग्रस्त वक्तव्याचा प्रयोग केला आहे. परिणामी राज्यातील परिस्थिती बिघडली आहे.

मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असं नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर भाजपनं नाना पटोले यांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केली आहेत.

नाना पटोले यांना अटक करण्यात यावी यासाठी भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. अशात आता नानांवर टीका करताना भाजप नेत्यांनी देखील वादग्रस्त वक्तव्याचा प्रयोेग केला आहे.

भाजप आमदार अनिल बोंडेंनी नाना पटोलेंची पंजा छाटण्याची भाषा केली होती. तर त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

अकोला भाजप युवा मोर्चाच्या वतीनं नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी नानांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वाद वाढला आहे.

नाना पटोलेंची जीभ कापा 1 लाख रूपये बक्षीस मिळवा, असं वादग्रस्त वक्तव्य जोगस यांनी केलं आहे. परिणामी आता वाद संपण्याऐवजी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जोगस आणि बोंडे यांनी नाना पटोलेंवर टीका करताना अगदीच वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता काॅंग्रेसकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या या वादानंतर भाजपची आक्रमकता पहाता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?” 

‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला