KL Rahulच्या वक्तव्यानं वाढलं शिखर धवनचं टेन्शन, म्हणाला…

मुंबई | भारतीय क्रिकेट संघ सध्या मोठ्या बदलांमधून जात आहे. गेल्या 7-8 वर्षात भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीनं आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ आता तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. परिणामी भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत.

भारतीय वनडे संघाचा नियोजित कर्णधार रोहित शर्मा अनुुपस्थित असल्यानं भारतीय संघाची कमान धाकड फलंदाज के एल राहुलच्या खांद्यावर असणार आहे.

भारतीय संघामध्ये सध्या रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये सलामीला कोण येणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. त्याचं उत्तर कर्णधार राहुलनं दिलं आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन यांच्यापैकी सलामीला उतरणार कोण हे अद्याप स्पष्ट नाही.

गेल्या 14-15 महिन्यांपासून मी संघासाठी कोणत्याही स्थानावर फलंदाजी करत आहे. अशा परिस्थितीत रोहितच्या अनुपस्थितीत मी सलामीवीर म्हणून उतरणार असल्याचं के एल राहुलनं स्पष्ट केलं आहे.

केएल राहुलच्या या स्पष्टीकरणानंतर सर्वाधिक जास्त ताण हा शिखर धवनच्या फलंदाजीबाबत असणार आहे. कारण केएल राहुलसह सलामीला दुसरा खेळाडू म्हणून किशन किंवा गायकवाड येण्याची शक्यता आहे.

राहुल हा सध्या भारतीय संघाचा सर्वाधिक भरवशाचा फलंदाज मानला जातो. परिणामी त्याच्या सलामीला येण्यानं तो रोहितची कमी भरून काढू शकतो असा संघ व्यवस्थापनाचा अंदाज आहे.

आता हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे की केएल राहुलच्या सोबतीला दुसरा खेळाडू कोण येतो. अन् शिखर धवन सोडून इतर खेळाडू सलामीवीर म्हणून आल्यावर धवन कोणत्या स्थानावर खेळतो.

दरम्यान, भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच इतर कर्णधाराच्या हातखाली खेळणार आहे. परिणामी चाहत्यांना विराटच्या फलंदाजीचा झंझावात पहायला मिळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?” 

‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला