“…म्हणून त्यावेळी नरेंद्र मोदींवरची कारवाई टळली”, शरद पवारांचा मोठा खुलासा

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुजरातचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) यांनी काही आरोप असतानाही कारवाई केली नाही, अशी चर्चा कायम असते. यावर शरद पवारांनीच उत्तर दिलं आहे.

सुडाचं राजकारण करता कामा नये, अशी माझी आणि मनमोहन सिंग यांची भूमिका होती. या भूमिकेला इतर काँग्रेस (Congress) नेत्यांचा विरोध होता, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

हो हे काही अंशी खरं आहे. आम्हा दोघांचही आग्रही मत होतं की, आपण सुडाचं राजकारण कधी करता कामा नये. निवडणूक किंवा इतर मतभेद होतात. त्यावेळी काय बोलायचं असेल तर बोलू. परंतु, एका चौकटीच्या बाहेर जाता कामा नये, असं शरद पवार म्हणाले.

तसेच आम्ही ते चौकटीच्या बाहेर जावू दिलं नाही. त्यावेळेस आमच्या काही सहकाऱ्यांनी गुजरातमध्ये मंत्री असलेल्या लोकांविषयी टोकाची भूमिका घेतल्याचंही शरद पवारांनी सांगितलं आहे.

त्यांनी घेतलेली भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत नव्हती, ही वस्तुस्थिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी देशातील सद्यस्थितील राजकारणावर भाष्य केलं आहे.

दुर्देवाने आज जे सुडाचं राजकारण सुरू आहे ते ठिक नाही. अनिल देशमुख (Anil Deshmukh) महाराष्ट्रात मंत्री होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर अनेक आरोप झाले त्यातील एकच आरोप शिल्लक असल्याचं पवारांनी सांगितलं.

तो आरोप म्हणजे त्यांनी शिक्षण संस्थेला मदत करण्यासाठी कोणत्यातरी एका कंपनीकडून 4 कोटी घेतले. ती रक्कम शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा झाली, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

ती रक्कम सत्तेचा दुरूपयोग करून घेतली, असा आरोप होत आहे. परंतु, पैसे शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा आहेत, असं तपास यंत्रणांचं म्हणणं असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या कारवाईवरील टोकाचा दृष्टीकोन आहे, असा शरद पवार यांनी म्हटलं आहे. बुधवारी अनिल देशमुख यांच्याविरोधात 700 पानांच आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एका आरोपासाठी 700 पानांचं आरोपपत्र दाखल करण यातून या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन किती टोकाचा हे लक्षात येतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“तो निर्णय माझा नव्हताच, मला यश आलं नाही ही वस्तूस्थिती”

“पंकजा मुंडेंना घरी पाठवण्याचं पाप केलं म्हणून भाजपची सत्ता गेली”

दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

 31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध

एक स्वप्न साकार झालं! पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार