कोरोनामुळे शरीरावर होतायेत गंभीर परिणाम; धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | लॉकडाऊनमुळे बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. याच वर्क फ्रॉम होममुळे कित्येक जणांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढलं. तसेच, स्क्रीनसमोर जास्त वेळ बसल्यामुळे डोळ्यांवरही त्याचा परिणाम झाला.

शरीराच्या आतील अवयवांवरही या सगळ्याचा परिणाम झाला. कोरोनामुळे आपल्या शरीरात नेमके काय बदल झाले, हे आपण जाणून घेणार आहोत. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

वर्क फ्रॉम होममुळे, किंवा लोक अधिक काळ घरात बसून असल्यामुळे त्यांचा स्क्रीन टाईम मोठ्या प्रमाणात वाढला. याचा परिणाम सर्वांच्याच डोळ्यांवर (Effect of corona pandemic on eyes) झाला आहे. कित्येक मुलांचे डोळे ऑनलाईन शाळेमुळे कमकुवत झाले आहेत.

जवळपास सगळ्यांनाच डिजिटल आय स्ट्रेनची (Digital eye strain) समस्या जाणवत आहे. मुलांच्या डोळ्यामध्ये कोरडेपणा, आणि डोळे जड होण्याची समस्या हे नेहमीचे झाले आहे. यासोबतच ऑनलाईन क्लासेसमुळे लहान मुलांमध्ये मायोपिया देखील वाढला आहे. कोरोनातून बरे झालेल्या कित्येकांना ब्लॅक फंगसची लागण झालेली पहायला मिळाली, ज्यामुळे अनेकांची दृष्टीदेखील गेली आहे, असं दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या नेत्र विज्ञान असोसिएट सल्लागार डॉ. टिंकू बाली राजदान यांनी सांगितलं.

इंडियन स्कॅल्प स्पेशलिस्टने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा लोकांच्या केसांवरही विपरीत परिणाम झाला आहे. देशात पोस्ट कोविड हेअर लॉसची (Post covid hair loss) कित्येक प्रकरणे समोर आली आहेत. अर्थात, यामुळे कायमचे टकलेपण येत नाही, तर योग्य निगा राखल्यास पुन्हा केस येऊ शकतात असेही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

महामारीनंतर रुट कॅनल आणि रेग्युलर डेंटल चेकअपची प्रकरणेही वाढली (Post covid effects on teeth) आहेत. सर गंगाराम रुग्णालयाच्या डॉ. अनुप राजदान यांनी सांगितले, की कोरोनामुळे रक्तवाहिन्यांवरही प्रभाव होतो. यामुळे दात, हिरड्या आणि जिभेपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे चेहऱ्यावर दुखत असल्यास, किंवा चेहरा सुन्न होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

ज्या लोकांना गंभीर स्वरुपात कोरोनाची लागण झाली होती, त्यांची व्यायामाची क्षमताही बरीच कमी झाली. यातच प्रदुषण आणि हवामानातील बदलामुळे कित्येकांना श्वास घेण्यास आणखी अडचण (Effect of weather on lungs) येते आहे. अर्थात, ब्रीदिंग एक्सरसाईज, योग, फुगा फुगवण्याचा व्यायाम यामुळे फुफ्फुसे मजबूत ठेवण्यास मदत होते आहे, असं सर गंगाराम रुग्णालयातील चेस्ट मेडिसिनचे असोसिएट सल्लागार डॉ. अभिनव गुलानिया यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही” 

“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा” 

“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही” 

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक झटका 

‘बंगळुरूतील त्या समाजकंटकांना शोधून काढा’; अजित पवारांचा कर्नाटकला इशारा