‘…तर Omicron चे दररोज 14 लाख रुग्ण सापडतील’; तज्ज्ञांच्या दाव्याने टेंशन वाढलं

मुंबई | कोरोना विषाणूचा (Corona Virus) नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचं (Omicron) नवं संकट जगासमोर उभं राहिलं आहे. अशावेळी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हेरियंटनं कहर केलाय. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक 93 हजार 45 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 111 कोरोनाबळी गेलेत.

गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत भयावह अशी वाढ होत आहे. अशात तज्ज्ञांनी धक्कादायक दावा केला आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत ओमिक्रॉन अधिक धोकादायक ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण आता अनेक देशांमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉन हा कोविडच्या डेल्टा प्रकारापेक्षा कमी गंभीर आहे आणि आतापर्यंत या विषाणूचं कोणतंही गंभीर प्रकरण नोंदवलं गेलेलं नाही. परंतु, त्याचा प्रसार दर आरोग्य तज्ज्ञांसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय आहे.

पश्चिम युरोपमध्ये उद्रेक झाल्यापासून 3-4 महिन्यांच्या अंतरानंतर आपण भारतात कोविड-19 चा प्रसार झाल्याचं पाहिलं आहे. म्हणून आपण दुसऱ्या लाटेत होतो, तसं सतर्क राहणं आवश्यक आहे, असं पल्मोनोलॉजीचे अध्यक्ष डॉ. जी. सी. खिलनानी म्हणालेत.

दिलेल्या लसीची तीव्रता कालांतरानं कमी होते. त्यामुळं संक्रमण टाळण्यासाठी कॉमरेडिटी असलेल्या लोकांना कोविडचा बूस्टर डोस देण्याचं धोरण जाहीर करण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉन आणि कोविडची प्रकरणं वेगानं समोर येत आहेत. त्यामुळं येत्या काही महिन्यांत या प्रकाराचा प्रभाव भारतातही दिसून येण्याची शक्यता आहे, असं खिलनानी म्हणालेत.

दरम्यान,ओमिक्रॉननं लंडन आणि स्कॉटलँडमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटलाही मागे सोडलंय. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा पाच पट अधिक आहे. लंडनमध्ये तर तब्बल 80 टक्के रग्ण ओमिक्रॉनमुळे बाधित झाल्याचं आढळून आलं आहे.

ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी प्रभावी असल्याचे कोणतेच पुरावे नाहीत, ब्रिटिश संशोधकांच्या दावानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे युरोपात आता अजून कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे एकूण 14 हजार 909 रुग्ण आढळले आहेत. तर 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण ओमिक्रॉनबाधित असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव डेल्टापेक्षा वेगानं होत असल्यानं रुग्णालायत ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढू लागलीय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ओमिक्रॉन संसर्गाचे रुग्ण 38.6 टक्के इतके आढळून येतायेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही” 

“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा” 

“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही” 

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक झटका 

‘बंगळुरूतील त्या समाजकंटकांना शोधून काढा’; अजित पवारांचा कर्नाटकला इशारा