मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. राज्यात मोठ्या थाटामाटात होणारे नेते मंडळींच्या घरचे लग्न सोहळे हे नेतेमंडळींना कोरोनाची लागण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. राज्यात रूग्णसंख्या वाढत चालली आहे.
राज्यातील ब़ड्या राजकीय नेत्यांना सध्या कोरोनानं गाठल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राज्यात अनके नेत्यांना कोरोनानं गाठलं आहे.
मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांचा नातू निहार ठाकरे यांचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात राज्यातील नेत्यांनी हजेरी लावली होती.
या लग्नाला उपस्थित असणाऱ्या नेत्यांना आता कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट व्हायला लागलं आहे. राज्याचे महसुल मंत्री काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे.
अंकिता पाटील यांचे वडील हर्षवर्धन पाटील यांचीही कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. परिणामी आता या विवाहाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपली चाचणी करून घ्यावी लागणार आहे. यासोबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देखील कोरोनानं घेरलं आहे.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना सरकारच्या शिलेदारांनाच कोरोनानं घेरलं आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी कोरोनाची राजकीय नेत्यांना लागण होण्याचं प्रमाण सध्या वाढल आहे. नियम हे फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
दरम्यान, कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. परिणामी राज्य सरकार समोरचं संकट सुद्धा आता वाढताना दिसत आहे. सरकारनं निर्बंध लावायला सुरूवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, ओमिक्राॅन रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ
महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत
भाजप खासदार म्हणतात,”नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हा बोगसपणा, लग्न समारंभात…”
नाशकात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-
मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता