‘जवा बघतीस तू माझ्याकडं’ गाण्यावर आमदाराने धरला ठेका; पाहा व्हिडीओ

जालना |  सोशल मीडियावर (Social Media) रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात. सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे आता सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे.

अशातच आता बदनापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नातील हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे.

‘जवा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’, या गाण्यावर आमदार नारायण कुचे यांनी डान्स केला आहे. एका पंचतारंकित हाॅटेलमध्ये हळदीच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे.

आमदार नारायण कुचे यांच्या कार्यकर्त्यांनी या व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचं दिसून येत आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभेत भाजप आमदारांनी गोंधळ घातला होता. त्यावेळी 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यात नारायण कुचे यांचा देखील समावेश आहे.

कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना आता लग्नसराईवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता अनेकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या नियमावलीमध्ये लग्न समारंभावर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत.

दरम्यान, लग्न जर बंदीस्त हॉलमध्ये असेल तर तिथं उपस्थित नागरिकांची संख्या ही 100 पेक्षा जास्त असू नये तर खुल्या जागेवर असेल तर तिथे 250 पेक्षा जास्त नागरिक असू नये, असे नियम आहेत.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

भाजप खासदार म्हणतात,”नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हा बोगसपणा, लग्न समारंभात…”

 नाशकात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-

मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

 ‘…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागेल’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य