कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी धडकी भरवणारी आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने गुरूवारी रात्री उशिरा नवी नियमावली जाहीर केली आहे.

लग्न समारंभ, अत्यंविधी यावर पुन्हा एकदा निर्बंध आले आहेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात हे नवे निर्बंध लागू होणार आहेत.

राज्य सरकारचे नवे निर्बंध-

  1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न समारंभासाठी 50 लोकांच्याच उपस्थितीला परवानगी
  2. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील सर्व प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
  3. अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
  4. पर्यटनस्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने इ. ठिकाणी कलम 144 लागू

दरम्यान, राज्यात कोरोना परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला निर्बंध कडक करण्याची मुभा देण्यात आली आहे.शिवाय यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.

ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा वाढता फैलाव बघता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध कठोर करण्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सूचक वक्तव्य देखील राजेश टोपे यांनी केलं होतं.

राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यानूसार राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात ओमिक्रॉनबाधितांची संख्या साडे चारशेच्या पुढे गेली आहे. तर साडे पाच हजारांच्या आसपास नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

टेन्शन वाढलं! राज्यातील ‘या’ पाच बड्या नेत्यांना कोरोनाची लागण

‘जवा बघतीस तू माझ्याकडं’ गाण्यावर आमदाराने धरला ठेका; पाहा व्हिडीओ

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

जळगावात शिवसेना-राष्ट्रवादी आमने सामने; गुलाबराव पाटलांचं खडसेंना प्रत्युत्तर

काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, ओमिक्राॅन रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ