राज्यात कोरोनाचा शिरकाव; आठवड्याभरात तब्बल ‘इतक्या’ पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई | कोरोनाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या पाहता सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅनचाही (Omicron) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.

ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांनी निर्बंधांचे सक्तीनं पालन करावे असं वारंवार सांगण्यात येत आहे. सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

राज्यात आतापर्यंत 46 हजार पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 500 पोलिसांचा (Police) कोरोनाने बळी गेला आहे.

राज्यामध्ये सध्या 8 हजार 836 पोलीस क्वारंटाईन आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. रुग्णसंख्या जर अशीच वाढत राहिली तर तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

राज्यात पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण तीनपटीनं वाढले आहे. कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनानंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. निर्बंधांमध्येही सक्ती केल्याचं पहायला मिळत आहे.

सध्या देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅनची धास्ती पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नववर्षापासून ते आतापर्यंत म्हणजेच 6 जानेवारीपर्यंत असलेली कोरोना आकडेवारीत वाढ झाली आहे.

नव्या कोरोनाग्रस्तापैकी 80 टक्के रुग्णांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण होत असल्यामुळे नागरिकांनी आणखी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘लस नाही, तर रेशनही नाही’; ‘या’ भागात नवे आदेश

बूस्टर डोसबाबत नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम

‘तिसरी लाट सौम्य असण्याची शक्यता, मात्र…’; तज्ज्ञांचा इशारा

चिमुकल्याच्या हुशारीमुळे वाचला आईचा जीव, आई बेशुद्ध झाल्यावर केलं असं काही की…

बापरे! राज्यात कोरोनाचा धुमाकूळ, गेल्या 24 तासात रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ