तरूणाला oyo वरून रूम बुक करणं पडलं महागात, घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

नवी दिल्ली | oyoवरून रूम बुक करणं तरूणाला चांगलंच महागात पडलं आहे. एका तरूणाने ओयोवरून रूम बुक केली आणि त्याच्यासोबत भलताच प्रकार घडला.

ओयो हॉटेल्सची सध्या चांगलीच चलती आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या ओयोची कोट्यवधींची उलाढाल आहे. पण एका तरूणाला ओयोवरून रूम बुक करणं भोवलं आहे.

9 मित्रांच्या ग्रुपने ओयोवरून रूम बुक केली खरी पण ते मित्र चांगलेच अडचणीत आले. या ग्रुपमधील अभिशांतने लिंकडीनवर हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

या मित्रांनी पुदुच्चेरी येथे एका हॉटेलमध्ये रूम बुक केल्या होत्या. हे 9 जण 74612 रॉयल प्लाझा बोर्डिंग अँड लॉजिंग येथे 24 डिसेंबरच्या रात्री पोहोचणार होते.

हे 9 जण त्या हॉटेलच्या पत्त्यावर पोहोचले खरे पण त्यांना हॉटेल सापडता सापडेना. आजूबाला चौकशी केली पण त्या परिसरात कोणतंच हॉटेल नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

रात्री उशिरा हे 9 जण एका भयानक आणि सुनसान रस्त्यावर अडकले, असं अभिशांतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर त्यांनी कस्टमर केअरला फोन केला व त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

त्या लोकांनी कस्टमर केअरला फोन केला असता त्या नावाची कोणतीही प्रॉपर्टी अस्तित्वात नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे अपरात्री या 9 मित्रांची नाहक बेजारी झाली.

रात्री 9 ते 11 या वेळेत हे मित्र तिथेच उभे होते. या वाईट अनुभवाचं वर्णन अभिशांतने त्याच्या पोस्टमध्ये केलं आहे. त्यामुळे ऑनलाईन कोणतीही बुकिंग करताना नीट पडताळणी करणं आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘लस नाही, तर रेशनही नाही’; ‘या’ भागात नवे आदेश

‘कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं काम करु नक’; ‘त्या’ ट्विटवरुन चंद्रकांत पाटलांचा इशारा

रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट चांगलंच भोवलं, भाजप नेत्याची सहा तास चौकशी

मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती, राजेश टोपे म्हणाले…

मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती, राजेश टोपे म्हणाले…