मुंबई | बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी दिमाखात पार पडला. 17 सदस्यांसोबत सुरू झालेला हा 100 दिवसांचा प्रवास अखेर संपला.
शेवटच्या टप्प्यात जय दुधाणे, विशाल निकम, मीनल शहा, विकास पाटील व उत्कर्ष शिंदे या पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या टॉप 5 स्पर्धकांमधून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होत.
अखेर सर्व स्पर्धकांना मागे टाकत विशाल निकमने बाजी मारली. ‘बिग बॉस मराठी 3’चा महाअंतिम सोहळा दिमाखात पार पडला आणि विशाल निकम बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा महाविजेचा ठरला.
विशाल निकमची टास्क जिंकण्याची जिद्द, त्याचा चिकाटीपणा, खेळाडूवृत्ती सोबतच विशालचा घरातील वावर यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. प्रसंगी तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने देखील चर्चेत राहिला.
‘बिग बॉस 3’च्या घरातील सर्व स्पर्धकांना मागे टाकत विशाल निकम महाविजेता ठरला. महाविजेत्या पदासोबतच विशाल भलीमोठी रक्कम घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर पडला.
बिग बॉसच्या विजेत्या स्पर्धकाची चमचमती ट्रॉफी तर सर्वांनाच माहिती आहे. ‘बिग बॉस मराठी 3’चं महाविजेतेपद पटकावलेल्या विशाल निकमला बिग बॉसच्या ट्रॉफीसह 20 लाख रूपयांचा धनादेश मिळाला आहे.
बिग बॉस हा शो कितीजरी वादग्रस्त असला तरी तितकाच लोकप्रिय देखील आहे. बिग बॉस मराठीच्या इतर दोन पर्वांप्रमाणेच यंदाचं तिसरं पर्व देखील तितकच लोकप्रिय ठरलं.
बिग बॉसच्या घरातील सदस्यांची भांडणं, वेगवेगळे टास्क आणि सोबत अनेक मनोरंजक ट्विस्ट्स यामुळे देखील बिग बॉस मराठीच्या या सिझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
सांगलीच्या विशाल निकमने त्याच्या करिअरची सुरूवात मिथुन या चित्रपटाद्वारे केली. हा सिनेमा 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. बिग बॉसच्या घरातूनही त्याला चांगली लोकप्रियता मिळाली. विशालच्या चिकाटीला यश आलं आणि बिग बॉस मराठी 3 चा महाविजेता ठरला.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न केले जातायेत – नारायण राणे
मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात Omicron रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ
विधानसभेत कोरोनाचा शिरकाव! अधिवेशनातील ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण